कोंढव्यात भरतोय बकऱ्यांचा अनोखा बाजार…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

बकरी ईद निमित्त बकऱ्याची कुर्बानी देऊन मुस्लिम बांधव एकमेकांना मेजवानी देऊन उत्साहात बकरी ईद साजरी करतात. बकरी ईदच्या दिवशी बकरी हलाल करण्यास मोठे महत्व आहे. कोंढव्यातील कौसरबाग भागात बकऱ्यांचा अनोखा बाजार भरतोय. तब्बल २००० हुन अधिक बकरे येथे विक्रीसाठी आणले गेले आहेत. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातील विविध राज्यातून व्यापारी इथे बकऱ्यांची विक्री करण्यासाठी आले आहेत.
[amazon_link asins=’B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cee89ecc-a2e2-11e8-aad5-61ae436f2647′]

कोंढवा बकरी बाजारमध्ये जवळपास ८० टक्के व्यापारी हे हिंदू आहेत. विविध जातीतील वेगवेगळ्या वजनाचे बोकड येथे पाहायला मिळतात. एका बोकडाचे वजन तर तब्बल १५० किलोपेक्षा जास्त असल्याने त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी बाजारात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र वक्फ लिबरेशन एण्ड प्रोटेक्शन टास्क फोर्सच्या वतीने कौसरबाग येथे या बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dac60899-a2e2-11e8-9078-67e2c96c46ee’]
महाराष्ट्र वक्फ लिबरेशन एण्ड प्रोटेक्शन टास्क फोर्सचे अध्यक्ष सलीम मुल्ला म्हणाले कि, या बाजारातून विक्री होणाऱ्या प्रत्येक बकऱ्यामागे १०० रुपये दान स्वरूपात वर्गणी गोळा केली जाते. या वर्गणीचा वापर अल्प-उत्त्पन्न गटातील तसेच अनाथ मुलांच्या शिक्षणाकरिता करण्यात येणार आहे. तसेच येथे उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या शेड चा खर्च देखील अत्यल्प असल्यामुळे साहजिकच बकऱ्यांच्या किमती कमी आहेत. त्यामुळे व्यापारी आणि नागरिक खूप आनंदी आहेत. केवळ मुस्लिम व्यापाऱ्यांनाच स्थान न देता इतर जाती धर्मातील व्यापाऱ्यांचे आम्ही स्वागत केले आहे. या अनोख्या उपक्रमामुळे सर्वांना दोन पैसे मिळतीलच मात्र समाजात एक बंधुभावाचा संदेश नक्की जाईल अशी आम्हाला आशा वाटत असल्याचे मुल्ला म्हणाले.