केसांचा भांग पाडणारी फॅशनेबल हत्तीण बनलीय चर्चेचा विषय !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजपर्यंत अनेकांना हत्त्तीची काळजी घेताना त्याला वेळेत खायला देणे, अंघोळ घालणारे महुत पाहिले आहे. मात्र सध्या तामिळनाडूमध्ये एका अगदीच स्टायलिश हत्तीची चर्चा आहे. हत्तीच्या डोक्यावरील केसांचा चक्क भांग पाडला जातो. होय हे खरं आहे या हत्तीणीचं नाव आहे सेंगामल्ला.

तामिळनाडूमधील थिरुवारुर जिल्ह्यातील मन्नारगुडी येथील राजगोपालस्वामी मंदिरामधील ही हत्तीण ‘बॉब- कटींग सेंगामल्ला’ नावाने प्रसिद्ध आहे. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिस असणार्या सुधा रामेन यांनी ट्विटवरुन सेंगामल्लाचे काही अगदी गोंडस फोटो शेअर केले आहेत. ती बॉब- कटींग सेंगामल्ला नावाने लोकप्रिय आहे. तिच्या केवळ हेअरस्टाइलचा मोठा चहाता वर्ग आहे.

तुम्ही तिला पाहण्यासाठी तामिळनाडूमधील थिरुवारुर जिल्ह्यातील मन्नारगुडी येथील राजगोपालस्वामी मंदिरात जाऊ शकता, असे सुधा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दोन दिवसांच्या आत 4 हजार 900 हून अधिक जणांनी ही पोस्ट शेअर केली आहे. आतापर्यंत 29 हजारहून अधिक जणांनी ही पोस्ट लाइक केली आहे. अनेकांनी कमेंट करुन सेंगामल्ला खूपच गोंडस दिसत असल्याचे म्हटले आहे. तर या हत्तीणीला पहिलेल्या काही जणांनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत.