नगर विकास विभागाने पुणे मनपा हद्दीत समाविष्ट करावयाच्या ‘त्या’ 23 गावांबाबतची माहिती मागवली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट करावयाच्या त्या 23 गावांबाबतची माहिती नगर विकास विभागाने जिल्हाधिकार्‍यांकडून मागवली आहे. यापुर्वी 34 गावांचा समावेश करण्याच्या अनुषंगाने सन 2014 मध्ये प्राथमिक अधिसूचना काढण्यात आली होती. 4 ऑक्टोबर 2017 रोजीच्या अधिसूचनेन्वये 34 पैकी 11 गावांच्या समावेशनाबाबतची अंतिम अधिसूचना काढण्यात आली होती. आता उर्वरित अशा 23 गावांबाबतची माहिती नगर विकास विभागाने जिल्हाधिकार्‍यांकडून मागविली आहे.

 

समावेशनाबाबत विचाराधीन असलेल्या उर्वरित 23 गावांची नावे पुढील प्रमाणे – म्हाळुंगे, सूस, बावधन बु., पिसोळी, कोंढवे-धावडे, न्यू कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बु., नर्‍हे, मंतरवाडी, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाची वाडी, शेवाळे वाडी, नांदोशी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी, वाघोली.

 

You might also like