पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांच्या हत्येत एकाच शस्त्राचा वापर

बंगलोर : वृत्तसंस्था

कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्रा. एम. एम. कलबुर्गी व पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी एकाच शस्त्राचा वापर करण्यात आल्याचे एसआयटीने म्हटले आहे. ही हत्या परशुराम वाघमारे यानेच केली असल्याची माहिती विशेष तपास पथकाने पीटीआयला दिली.

पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या वाघमारेने ज्या हत्याराने केली त्याच हत्याराने ,गोविंद पानसरे आणि एम एम कलबुर्गी यांचीही हत्या करण्यात आली. तिन्ही हत्यांसाठी ज्या गोळ्या झाडण्यात आल्या, त्या गोळ्यांच्या मागील बाजूस एकसारख्याच खुणा आढळल्या, अशी माहिती एसआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

दरम्यान, लंकेश, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येत वापरण्यात आलेले हे शस्त्र आतापर्यंत पोलिसांच्या हाती लागलेले नाही.