भाजपच्या स्टार प्रचारकाच्या सभेला मतदारांनी फिरवली पाठ

अन खुर्च्या गाडीतच राहिल्या... सभेच्या जागी घडला अजब किस्सा !

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन (विष्णू बुरगे) – लातूर शहरातील गंज गोलाईमध्ये आज नितीन गडकरी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. गडकरी यांची सभा होणार असल्याने लोकांनी गर्दी केली होती. सभेची दुपारची एकची वेळ असताना साडेतीन वाजले तरी नितीन गडकरी सभेच्या ठिकाणी पोहचले नाहीत. आणि नागरिकांनी या ठिकाणाहून काढता पाय घेतला. त्यामुळे सभेच्या ठिकाणी गाडीतून आणलेल्या खुर्च्या गाडीतून खाली काढण्यातच आल्या नाहीत.

गंज गोलाई हे ठिकाण शहरातील प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणच्या मतदारांना आकर्षीत करण्यासाठी नितीन गडकरी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र नागरिकांचा आणि व्यपाऱ्यांचा फारसा प्रभाव पडलेला दिसून आला नाही. ज्या गाड्यांमध्ये खुर्च्या आणल्या होत्या त्या लोक नसल्याने गाडीतील खुर्च्या उतरवण्यातच आल्या नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला गर्दी होत आहे. मात्र आज नितीन गडकरी यांच्या सभेला लोकांनी पाठ फिरवली. त्यामुळे भाजपच्या स्टार प्रचारकाच्या सभेला गर्दी जमवण्याचे मोठे आव्हान पदाधिकाऱ्यांपुढे आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like