‘कोरोना’ लसीची प्रतिक्षा अखेर संपली ! आदर पूनावाला यांनी सांगितलं कोणत्या महिन्यात येणार लस ?

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी कोरोनाच्या लशीबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. कोरोना लशीच्या 100 दशलक्ष डोसची पहिली तुकडी 2021 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत उपलब्ध होईल असं आदर पूनावाला यांनी सांगितलं आहे.

आदर पूनावाला म्हणाले, “एसआयआय (Serum Institute of India – SII)निर्मित ऑक्सफर्ड कोरोनाव्हायरस लशीच्या 100 दशलक्ष डोसची पहिली तुकडी 2021 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत उपलब्ध होईल. ऑक्सफर्ड कोरोना लस अत्यंत किफायतशीर असेल” असंही त्यांनी सांगितलं आहे. इतकंच नाही तर आम्ही पहिल्यांदा 100 दशलक्ष डोस देण्याच्या उद्दिष्टावर काम करत आहोत. ते 2021 च्या Q2-Q3 पर्यंत उपलब्ध होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

‘तर डिसेंबरच्या मध्यापर्यंत आमच्याकडे ही लस उपलब्ध असेल’

पुढं बोलताना पूनावाला म्हणाले, “जर युकेनं आगाऊ चाचणी केली असेल आणि त्यांनी आमच्यासोबत आकडेवारी शेअर केली तर आपत्कालीन चाचण्यांसाठी आम्ही आरोग्य मंत्रालयाला अर्ज करू आणि तिथून ते मंजूर झाल्यानंतर आम्हीसुद्ध हीच चाचणी भारतात करू शकू. हे सर्व यशस्वी झालं तर डिसेंबरच्या मध्यापर्यंत आमच्याकडे ही लस उपलब्ध असेल.”

You might also like