भर सभेत नगरसेवकाने घातली जल अभियंत्याला अंघोळ 

कोल्हापूर: पोलीसनामा आॅनलाईन
महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत आज भलताच प्रकार पाहायला मिळाला. कोल्हापूर महानगरपालिकेत जल अभियंत्याला भर सभेत अंघोळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सुरेश कुलकर्णी असे त्या अभियंत्याचे नाव आहे. महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा होती यावेळी शिवसेनेचे नगरसेवक नियाज खान यांनी सुरेश कुलकर्णी यांना बादलीभर पाण्याने अंघोळ घातली. यानंतर भर सभेत एकच गोंधळ उडाला. महानगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात ही सभा सुरू होती. शहरातील पाणीप्रश्नावरून ही विशेष सभा बोलाविण्यात आली होती.
 [amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ec979df2-cbad-11e8-b2be-57ac50ce8867′]
शहरामध्ये गेले अनेक दिवस अपुऱ्या आणि दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न भेडसावत आहे. शहरात महिलांनी पाण्यासाठी रस्ता रोको सुद्धा केले आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून मोठा गदारोळ पाहायला मिळाला.  दूषित पाणी अपुऱ्या पुरवठ्यावरून नगरसेवक संतापले असून आजच्या सभेत महापालिकेचे जल अभियंता कुलकर्णी यांना चांगलेच धारेवर धरले. नवरात्र उत्सव दसरा हे सण तोंडावर असताना कोल्हापूर शहरात शहरातील पाणीपुरवठा हा विस्कळीत झाला आहे यामुळे आक्रमक झालेल्या शिवसेनेचे नगरसेवक नियाज खान यांनी भर सभेत बादलीभर पाण्यात महापालिकेचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना अंघोळ घातली.
पाण्याचा प्रश्न सर्वांना भेडसावत असल्याने महापालिकेत आज विशेष सर्वसाधारण सभेचे आयाेजन करण्यात आले होते. यावेळी संतापलेल्या नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या दिशेने फाईल्स सुद्धा फेकल्या. तसेच जल अभियंत्याला पाण्याने अंघोळ घालण्यात आली. विस्कळीत झालेल्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
[amazon_link asins=’B002U1ZBG0,B00KNN4N4I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’22801f02-cbae-11e8-8212-997e89936800′]
लोकसभा २०१९ : ‘हा’ पक्ष  असेल भाजपचा नविन मित्रपक्ष 
चेन्नई -केंद्रामध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळविण्यासाठी भाजप आतापासूनच नियोजन आखत आहे. दक्षिणेत जास्तीत जास्त जागा मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.त्यामुळे अण्णा द्रमुक पक्षाकडून भाजपला  दक्षिणेत पाठिंबा मिळणार का या विषयी चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी दिवंगत सी.एन. अन्नादुराई व जयललिता यांना भारतरत्न आणि चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानकाला दिवंगत एम.जी. रामचंद्रन, यांचे नाव देण्याची मागणी पलानीस्वामी यांनी केली. तसेच आगामी २०१९  च्या निवडणुकांसाठी भाजपला साथ देणार का ? या प्रश्नावर त्यांनी सूचक विधान केले. त्यामुळे भाजपला तामिळनाडूमध्ये नवा मित्र मिळण्याची शक्यता आहे.
[amazon_link asins=’B074ZF7PVZ,B07GB9Z17Z’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b960ffe9-cbae-11e8-8f75-79aaf68f7904′]