आशियातील 20 श्रीमंत व्यक्ती चालवू शकतात 20 गरीब देश, यादीत मुकेश अंबानींचाही समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील एक मोठी लोकसंख्या आशिया खंडात राहते. जागतिक बँकेच्या अहवालानुसार 2018 मध्ये सुमारे 783 दशलक्ष लोक दारिद्र्य रेषेखालील जगत आहेत. त्यापैकी 33 टक्के दाक्षिणात्य लोक आशियामध्ये राहतात, तर 9 टक्के लोक पूर्व आशिया आणि आशिया पॅसिफिकमध्ये राहतात.

20 परिवारांकडे जास्त पैसे –

असे नाही की आशिया खंडात पैसे नाहीत. पण आशियातील बराचसा पैसा काही श्रीमंत कुटुंबांपुरता मर्यादित आहे. जर आपण आशिया खंडाचा विचार केला तर येथील 20 श्रीमंत कुटुंबांकडे जीतकी संपत्ती आहे. ती आशियामधील 20 गरीब देशांच्या अर्थव्यवस्थे एवढी आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार या 20 कुटुंबांची मालमत्ता 450 अब्ज डॉलर्स (38.9 लाख कोटी रुपये) आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे कुटुंब पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी त्यांचा धाकटा भाऊ अनिल अंबानी यांचा क्रमांक या यादीत 17 व्या क्रमांकावर आहे. या यादीत शपूरजी पलोनजी समूह आणि हिंदुजा ब्रदर्स यांचादेखील समावेश आहे.

आशियातील टॉप 5 श्रीमंत –

मुकेश अंबानी (रिलायंस इंडस्ट्रीज) – 50.4 बिलियन डॉलर
वाल्टर क्वोक पिंग शंग- (हांगकांग) -38 बिलियन डॉलर
धनिन चेरवनोंट (बैंकॉक) – 37.9 बिलियन डॉलर
रॉबर्ट बुडी हार्टोनो (इंडोनेशियाई) – 32.5 बिलियन डॉलर
ली ब्युंग चुल सैमसंग (दक्षिण कोरिया) – 28.5 बिलियन डॉलर

गरीब देशांचा जीडीपी 668 बिलियन डॉलर –

आयएमएफच्या आकडेवारीनुसार, वर्ष 2018 साठी गरीब आशियाई देशांचा एकूण जीडीपी सुमारे 668 अब्ज डॉलर्स आहे. या देशांची एकूण लोकसंख्या 213 दशलक्ष आहे. भूतान हा आशियातील सर्वात कमी जीडीपी असणारा देश आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

तुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे

शरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यांचे सेवन, जाणून घ्या

देशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्त, अशी घ्या काळजी

नैसर्गिक सौंदर्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, निस्तेज, कोरडा चेहरा होईल तजेलदार

काकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत

कोणत्या फळात किती पाणी, जाणून घ्‍या ; वजन कमी करण्यासही फायदेशीर