home page top 1

हुंडा किती असावा हे सांगणारी वेबसाईट वादात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

हल्ली सामान्य लोकांना घर, हॉटेल,अशा अनेक गोष्टी सहज उपलब्ध करून देणाऱ्या बऱ्याच वेबसाईटस असतात मात्र आता चक्क एखाद्या उपवर मुलाचा हुंडा किती असावा, याची मोजदाद करणारी वेबसाईट आहे. पण ही वेबसाईट चांगलीच वादात सापडली आहे. कारण हुंडा घेणे -देणे याला कायद्याने बंदी आहे मात्र आशा पद्धतीची वेबसाईट चुकीचा संदेश पसरवत असल्याने हुंड्याला प्रोत्साहन देणाऱ्या या वेबसाईटवर काँग्रेसने कारवाईची मागणी केली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, www.dowrycalculator.com असे या वेबसाईट चे नाव आहे . सध्या या वेबसाईटवर सध्या नेटिझन्सच्या उड्या पडत आहेत. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याची तक्रार काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केली आहे. महिला बाल कल्याण मंत्री मनेका गांधी आणि माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद या दोन्ही नेत्यांना काँग्रेसने पत्र लिहिले आहे.

दरम्यान, ही वेबसाईट मनोरंजनाचं साधन असून, त्याचा गैर अर्थ घेऊ नये, असा युक्तीवाद या वेबसाईटच्या निर्मात्यांनी केला आहे. असे असले , तरी या वेबसाईटवरुन राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे.

Loading...
You might also like