गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर रात्रीत गायब 

शिरवळ (सातारा) : पोलीसनामा ऑनलाईन

मौल्यवान वस्तू, वाहन इत्यादी चोरीला गेल्याचे ऐकले असेल. पण सध्या कुठे गाव चोरीला जातेय तर कुठे विहीर… पण सातारा जिल्ह्यात खरोखरीच एक विहीर रात्रीत गायब झाली आहे. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील मांढरदेव डोंगराच्या कुशीत झगलवाडी गाव वसले आहे. या गावाला पाणि पुरवठा करणारी विहीर रातोरात गायब झाली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थही चक्रावले आहेत. तर या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’68cee846-c586-11e8-a2d0-1744978a799d’]

मांढरदेव डोंगराच्या कुशीत वसलेल्या झगलवाडी गावची लोकसंख्या ४१८ आहे. या गावाला पिण्याचा पाण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी १९९५ मध्ये ग्रामपंचायतने कर्नवडी हद्दीतील तिकाटणे शिवारात विहीर खोदली होती. या विहिरीतून झगलवाडी गावाला पाण्याचा पुरवठा होतो. या विहिरीवर असलेल्या मोटारीने पाणीपुरवठा करण्यासाठी मोटार बसवण्यात आली आहे. ही मोटारचे रिमोटद्वारे नियंत्रण होते. काल (रविवारी) मोटारीच्या रिमोटचे नियंत्रण होत नसल्याने ग्रामपंचातचे पाणि पुरवठा विभागाचे कर्मचारी हे विहिरीवर गेले. त्यावेळी पाणिपुरवठा करणारी विहीर अज्ञाताने जेसीबीच्या सह्याने बुजवून टाकल्याचे निदर्शनास आले.

[amazon_link asins=’B01EYSIQ3Q,B073QVG2GL’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8eb9f122-c586-11e8-904b-f5f6efc677f8′]

याबाबतची माहिती कर्मचाऱ्याने  सरपंच भरत लिमण, ग्रामसेविका एस. एस. महांगरे यांना दिली. यावेळी संबंधितांनी घटनास्थळी धाव घेतली असता संपूर्ण विहीर जेसीबीच्या साह्याने बुजवल्याचे निदर्शनास येताच खळबळ उडाली. या घटनेमुळे झगलवाडी परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात तोकडे कपडे घालणाऱ्या भाविकांना ‘नो एंट्री’

जाहिरात.