दारूमुळं संपुर्ण कुटुंब उध्दवस्त ! नवरा-बायकोच्या वादामुळं चौघांचा बळी

पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात लॉकडाऊनमध्ये दारुची दुकाने बंद असल्याने तळीरामांची गोची झाली आहे. त्यांना घरातच बसावे लागत असल्यामुळे पती-पत्नीमधील वादाच्या घटना घडत आहेत. कोरोनामुळे मागील दीड महिन्यापासून बंद असलेली दारुची दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे झालेल्या वादातून उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील एक महिलेने तीन मुलींसह ट्रेनखाली आत्महत्या केली. दारुवरुन महिलेचे पतीसोबत भांडण झाले होते. या घटनेनंतर पती फरार झाला आहे. ही घटना पिपराईच ठाणे क्षेत्रातील उनौला रेल्वे स्टेशनजवळील आहे. यापृकरणी अजय निषादविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूजा निषाद, सारिका (9 वर्ष), सिमरन (7 वर्ष), सौम्या (5 वर्ष) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. मुलींवरुनही पती-पत्नीमध्ये वाद होत होता. दरम्यान, दारु पिण्यावरुन पत्नीसोबत भांडण झाले त्यातच पत्नीने तीन मुलींसह आत्महत्या केली. दारुवरुन पती-पत्नीमध्ये भांडण होत होती. मात्र लॉकडाऊनमध्ये दारुची दुकाने बंद असल्याने गेल्या महिनाभरात दोघांमध्ये वाद होत नव्हते. मात्र काल 40 दिवसांनंतर दारुची दुकाने खुली झाल्याने पती पुन्हा दारु पिऊन घरी आला. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. यातच महिलेने तीन मुलींसह उनौला स्टेशनजवळ येऊन ट्रेनसमोर उडी मारली.