‘महाविकास’चे विजयी उमेदवार आ. सतीश चव्हाण यांचा सभापती अनिल नखाते यांच्या हस्ते सत्कार

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – मराठवाडा पदवीधर मतदारसंघात नुकतेच विजयी झालेले महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांचा पाथरी बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मराठवाड्यातील पदवीधर मतदारसंघात आमदार सतीश चव्हाण हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. आमदार सतीश चव्हाण यांनी मराठवाडा विधान परिषदेची जागा सलग तिसऱ्यांदा राखली. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात होते. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून त्याच्या विजयाचा अंदाज वर्तविला जात होता. हे अखेर खरे ठरले.

परभणी जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्या प्रचारार्थ आयोजित परिसंवादात त्यांना आत्मविश्वास दिला होता. जिल्ह्यातील नेत्यांनी आमदार सतीश चव्हाण यांना दिलेला विश्वास अखेर पूर्ण केला. परभणी, पालम, पूर्णा, पाथरी, सोनपेठ, मानवत, सेलू, जिंतूर, गंगाखेड या तालुक्यांतून आमदार सतीश चव्हाण यांना भरघोस मते मिळाली. आमदार सतीश चव्हाण यांच्या विजयात परभणी जिल्ह्याचा सिंहाचा वाटा असेल असे दुर्रानी यांनी पाथरी येथे आयोजित सहविचार सभेत सांगितले होते. जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केलेला विश्वास पूर्ण केला. पाथरी बाजार समितीचे सभापती अनिल नखाते, जि. प. माजी सभापती अशोक काकडे, बी. के. काकडे, प्रकाश रोकडे, दादाराव ताठे, मनोज वाडीकर, नितीन शिंदे, दिगंबर लिपणे, दिनकर नखाते, रामदास नखाते, डहाळे आदी सत्कार प्रसंगी उपस्थित होते.