‘पीसीएमसी इलेव्हन, अस्पात अॅकॅडमी’ ची विजयी सलामी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन 

पीसीएमसी इलेेव्हन आणि अस्पात अॅकॅडमी यांनी जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करताना आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर सहज विजय मिळवत अजितदादा चषक हॉकी स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीयम, नेहरूनगर येथे ही राज्यस्तरीय स्पर्धा सुरु आहे. आज दिवसभर पावसाचा जोर असतानाही खेळाडूंनी जराही विचलीत न होता चांगल्या कामगिरीवर भर दिला.

[amazon_link asins=’B01N05Z2UW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eb38fee1-8975-11e8-9161-b1c5e3a5a18e’]

अस्पात अॅकॅडमीने प्रियदर्शनी स्पोर्ट्स सेंटरवर ७-१ असा तर पीसीएमसीने आनंद गायकवाडच्या तीन गोलांच्या जोरावर सुपर इलेव्हनला ७-२ अशी धूळ चारली. सामन्याच्या पूर्वार्धात अक्षय राजपूतने दोन तर संकेत जोगळेकर, प्रशांत तोडकर आणि शक्ती ठाकूर यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवल्यामुळे अस्पात अॅकॅडमीला ५-० अशी अाघाडी मिळाली. प्रियदर्शनीच्या अब्दुल सलामनी याने २४ व्या मिनिटाला एक गोल नोंदवला पण तो एकमात्रच ठरल्याने अस्पात अॅकॅडमीला काळजीचे कारण राहीले नाही. उलट त्यांनी आपल्या गोलांचा धडाका उत्तरार्धातही सुरुच ठेवला. संकेत जोगळेकरने दुसरा गोल ३१ व्या मिनिटाला केला तर पृथ्वीराज साळुंकेने ३६ व्या मिनिटाला एक गोल केला.

दुसऱ्या सामन्यात, यजमान पीसीएमसी संघाने सहज विजय मिळवला. आनंदने २४ व्या ३६ व्या आणि ३९ व्या मिनिटाला गोल नोंदवत संघासाठी मोलाचा वाटा उचलला. त्याला अन्य खेळाडूंचीही चांगली साथ लाभली. अजय गोटे (२ वे मिनिट), वृषभ आव्हाड (९), अभिषेक माने (४०) आणि जितेंद्र गव्हाणे (४९) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. सुपर इलेव्हनकडून ऋषिकेश सारोलकर (१६) आणि योगेश उत्तेकर (३२) यांनी एकेक गोल केला.

निकाल

पीसीएमसी इलेेव्हन ७ (अजय गोटे २’, वृषभ आव्हाड ९’, आनंद गायकवाड २४’, ३६’, ३९’, अभिषेक माने ४०’, जितेंद्र गव्हाणे ४९’) वि. वि. सुपर इलेव्हन: २  (ऋषिकेश सारोलकर १६’, योगेश उत्तेकर ३२’). पूर्वार्ध ३-०
अस्पात अॅकॅडमी:  ७ (अक्षय राजपूत १३’, १८’, संकेत जोगळेकर १९’, ३१’, प्रशांत तोडकर १४’,  शक्ती ठाकूर २२’, पृथ्वीराज साळुंके ३६’) वि. वि. प्रियदर्शनी स्पोर्ट्स सेंटर: १ ( अब्दुल सलामनी २४’)

आज झाले उदघाटन…

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टी आयोजित अजित दादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित अजित दादा चषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचे उदघाटन सोमवारी पिंपरी येथील मेजर ध्यानचंद पाॅलीग्रास हॉकी स्टेडीयमवर झाले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधीपक्ष नेते दत्ता काका साने यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी नगरसेवक श्याम लांडे, निलेश अप्पा पंढरकर, विशाल काळभोर, हर्षवर्धन भोईर, कुणाल थोपटे, मयूर जाधव , प्रतीक साळुंखे, योगेश मोरे , रामनदीप सिंह कोहली, मंगेश बजबळकर यादी उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी युवक कांग्रेस पिंपरी चिंचवड शहरचे (जिल्हा) शहराध्यक्ष विशाल शंकरराव वाकडकर यांनी केले आहे.