१९८४च्या शीखविरोधी दंगलीतील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत १९८४ साली उसळलेल्या शीखविरोधी दंगलीशी संबंधित एका साक्षीदाराला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. सन १९८४ सालच्या शीखविरोधी दंगलीत काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचा सहभाग असल्याचे या साक्षीदाराने म्हटले आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b279b046-c14a-11e8-8df5-636ed24e2782′]

पोपरी कौर, असे या साक्षीदाराचे नाव आहे. कौर यांनी सांगितले की त्यांच्या दुकानाच्या भिंतीवर एक पोस्टर चिकटवण्यात आले होते. तुम्ही तुमच्या कुटुंबातील एक सदस्य गमावला आहे. साक्ष बदला अन्यथा दुसराही सदस्य गमावून बसाल, असे या पोस्टवर लिहिले आहे. त्या म्हणाल्या, की यापूर्वी त्यांना साक्ष बदलण्यासाठी पैशांचे आमिष देण्यात आले होते. ज्याला त्यांनी स्पष्ट नकार दिला होता. आता त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत.

[amazon_link asins=’B07417987C,B07D9G1GHB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c61add46-c14a-11e8-af8c-5df09ce8dd24′]

पण मी कुणाच्याही धमक्यांना भीक घालत नाही. मी कुणाला घाबरत नाही, असे त्या म्हणाल्या. दिल्ली शीख गुरूद्वारा व्यवस्थापन समितीचे कायदेविषयक सल्लागार जसविंदर सिंग जॉली यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना सांगितले की, शीख नरसंहाराच्या कौर या मुख्य साक्षीदार आहेत. सध्या हा मुद्दा पटियाला उच्च न्यायालयाच्या अधीन आहे. मी सुल्तानपुरी हिंसाचारातील साक्षीदाराला धमकी दिली जात असल्याप्रकरणी नव्याने याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली शीख गुरूद्वारा व्यवस्थापन समिती सध्या ८४ पीडितांचे कायदेविषयक बाबी हाताळत असून त्यांना सुरक्षा प्रदान करत आहे.

प्लास्टिक वापराला आता मुदतवाढ दिली जाणार नाही : रामदास कदम

इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख सुरक्षारक्षकांनी केलेल्या हत्येनंतर ८,००० शीखांना मारहाण आणि जाळण्यात आले होते. एकट्या दिल्लीत ३,००० शीख दंगलीत मृत्युमुखी पडले होते. राफेल विमान घोटाळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना काँग्रेसकडून लक्ष्य केले जात असल्याने काही दिवसांपूर्वीच भाजप नेत्यांनी या शीख दंगलीवरून काँग्रेसवर टीका केली होती.