3 मुलांची आई असणाऱ्या काकीचं पुतण्यासोबत ‘झेंगाट’, पतीची हत्या करून घरातच पुरला मृतदेह !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तीन मुलांची आई असलेल्या एका महिलेने आपल्या प्रेमी पुतण्यासोबत मिळून पतीची हत्या करून मृतदेह घरातच दफन केला आहे आणि त्यानंतर दोघेही फरार झाले आहेत. पोलिसांनी आरोपींचा तपास सुरु केला आहे. मध्यप्रदेशातील देहात पोलीस स्टेशन हद्दीतील हा खळबळजनक प्रकार आहे.

गंभीर सिंह चा मोठा भाऊ लाल सिंह ने पोलिसांना सांगितले की, रविवारच्या रात्री गंभीर सिंह सोबत शेवटचे बोलणे झाले होते. त्यानंतर पासून त्याने मोबाइल सुद्धा बंद ठेवला होता. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत त्याचा तपास केला पण काही उपयोग झाला नाही. घरातील काही भाग खोदलेला मिळाला तेव्हा त्या ठिकाणी पाहणी केली असता गंभीर सिंहचा मृतदेह सापडला.

त्यानंतर मृतक गंभीर सिंहच्या मोठ्या भावाने सांगितले की गंभीर सिंहची पत्नी कांता बाई (३०) आणि पुतण्या बृजेश (२५) यांच्यात बऱ्याच दिवसांपासून प्रेम संबंध सुरु होते आणि हे दोघेही पाच ऑगस्ट रोजी घरातून पळून देखील गेले होते आणि या घटनेपासून हे दोघेही गायब आहेत. पोलिसांनी मृत व्यक्तीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे आणि आरोपींचा तपास सुरु आहे.

Visit : Policenama.com