‘तिने’ ४ तरुणांशी लग्न करून लावला लाखोंचा चुना ; पुढे झाले असे काही

मनमाड : पोलीसनामा ऑनलाईन – एकाचवेळी अनेक मुलींशी लग्न करून एखाद्या पुरुषाने फसवणूक केल्याच्या घटना नेहमीच समोर येतात. मनमाड शहरातील एका तरुणीने मात्र मुलीदेखील याकामी कमी नाहीत हेच जणू  सिद्ध केले आहे. होय, येथील एका तरुणीने एक-दोन नाही तर तब्बल चार लग्न करून चार तरुणांची एकाचवेळी फसवणूक केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पाचवे लग्न देखील करण्याच्या तयारीत असणाऱ्या या तरुणीच्या हातात त्याआधीच बेड्या पडल्या.

या २२ वर्षीय तरुणीने घटस्फोट न घेताच पैशांसाठी एकाच वेळी ४ तरुणांशी विवाह करून त्यांची फसवणूक केली. या कारस्थानात तिच्याबरोबर तिचे आई वडील आणि लग्न जमवून  देणाऱ्या एक महिला व पुरुष अशा एकूण पाच जणांचा समावेश असून ही एक टोळीच असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येतंय.या पाचही जणांना अटक करून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान फसवणूक झालेली चारही तरुण वेगवेगळ्या भागातील आहेत. त्यामुळे अजूनही काही ठिकाणी तरुणांची फसवणूक झालेली आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

अशा प्रकारे करत होते फसवणूक, हा आहे घटनाक्रम :
पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, फसवणूक झालेले डोंगरे कुटुंबीय मनमाडच्या संभाजी नगर भागात राहणारे आहे. अशोक डोंगरे यांचा मुलगा जयेश याच्यासाठी मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी त्यांची ओळख ओळख पुजा गुळे (रा.अहमदपूर ) या महिलेशी झाली. तिने अहमदपूर येथील बंडू बेंद्रे यांची मुलगी ज्योती लग्नाची असून मुलगी सुंदर आणि शिकलेली आहे. परंतु बेंद्रे कुटुंबीय गरीब असून लग्नाचा सर्व खर्च तुम्हाला करावा लागेल तसेच  मदत करण्यासाठी त्यांना पैसेही द्यावे लागेल असं सांगितलं. त्यामुळे डोंगरे यांनी सुनेच्या अंगावर ५० हजार रुपयांचे दागिने घातले आणि लग्नाच्याआधी अगोदर ज्योतीच्या घरच्यांना ४० हजार रुपयेही रोख स्वरूपात दिले.  त्यानंतर जयेश व ज्योतीचा लग्न सोहळा १२ मे रोजी  पार पडला.

काही दिवस सासरी राहिल्यानंतर माहेरी गेलेली ज्योती आणि परत येण्यास वारंवार वेगवेगळी कारणे सांगत राहिली आणि आलीच नाही. त्यामुळे संशय आल्याने डोंगरे कुटुंबीयांनी चौकशी केली असता ज्योतीचे या अगोदर देखील 3 लग्न झालेले आहेत आणि चौथे लग्न तिने त्यांच्या मुलासोबत म्हणजे जयेश सोबत केल्याचं स्पष्ट झालं. एवढ्यावरच हे कुटुंबीय थांबलं नाही तर ज्योतीचं पाचवं लग्न करण्याचा देखील त्यांनी घाट घातल्याचं लक्षात येताच त्यांना मोठा धक्का बसला.

आपण आणि आपल्या मुलीशिवाय इतरांनादेखील या टोळीने लाखोंचा गंडा घातल्याचे लक्षात आल्यानंतर शांत न बसता डोंगरे कुटुंबीयांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठले आणि फसवणुकीची फिर्याद दिली. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्याचं कळताच  सर्वजण तडजोड करण्यासाठी अहमदपूरहून  मनमाडला डोंगरे यांच्याकडे आले. परंतु डोंगरे यांनी त्यांच्यावर विश्वास न ठेवता पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनीदेखील तत्परतेने कारवाई करत पोलिसांनी सापळा रचुन सर्वाना शिताफीने अटक केली. ज्योती, तिचे वडील बंडू बेंद्रे, आई विमल बेंद्रे तसेच लग्न जमवण्यात सहभागी असणारे पूजा भागवत गुळे व विठ्ठल पांडुरंग मुंडे या सर्व टोळीविरीधात भारतीय दंडसंहितेच्या कलम ४२०, ४९४, ४९५ आणि इतर कालमान्वये गुन्ह्यांची नोंद केली.

सर्व आरोपींना न्यायलयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. याशिवाय इतर सर्व प्रकरणांचाही तपास पोलीस करत आहेत. त्याचबरोबरीने या टोळीने इतर काही गुन्हे केले आहेत का याचादेखील तपास पोलीस करत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त – 

आहारा संबंधीचे काही ‘समज-गैरसमज’, जाणून घ्या ‘सत्य’

मसाल्याचे पदार्थ आरोग्यासाठी लाभदायक, होतात अनेक फायदे

स्लीम व्हायचंय का ? या उपायांनी सहज कमी होईल पोट

‘हे’ उपाय केले तर चष्मा लागणार नाही, नंबर वाढणार नाही

Loading...
You might also like