#Video : महिला पत्रकारांना पाहून ‘हा’ खेळाडू करतो असे काही, पाहून व्हाल थक्‍क

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – इंटरनेटवर या दिवसांमध्ये एक किसिंग व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ युक्रेनहून आला आहे. यूक्रेनचा स्टार फुटबॉलरने एका मुलाखतीत महिला रिपोर्टरला सगळ्यांसमोर किस केले. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. व्हिडीओ मध्ये किस करणाऱ्या व्यक्तीचे नाव ओलेकसैन्डर जिन्चेन्को आहे. रिपोर्टनुसार, ओलेकसैन्डरने सर्बिया ५-० ने विजय मिळवल्यानंतर आनंदाच्या भरात पत्रकार महिलेला किस केले.

 

व्हिडीओ मध्ये दिसते आहे की, महिला पत्रकार फ़ुटबाँल खेळाडूला प्रश्न विचारते आहे आणि त्याचवेळी अचानक ओलेकसैन्डर त्या महिलेला जवळ ओढून किस करते आहे. व्हिडीओ मध्ये दिसून आले आहे की, किस केल्यानंतर महिला पत्रकार कशी लाजते. ती महिला पत्रकार हातामधील फाईलने आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करते आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या रिएक्शन पण यायला लागल्या आहेत. एका व्यक्तीने ट्विटरवर लिहिले की, लोक या घटनेला लैंगिक छळ म्हणत आहेत परंतु ते दोघे चांगले मित्र आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

गर्भपिशवी काढावी की काढू नये ? काही समज-गैरसमज

छातीत जळजळ होत असल्यास दुर्लक्ष करू नका ; गंभीर आजाराचा संकेत

काळजी घ्या ; कमी झोप घेण्याचा थेट संबंध ‘ब्लड प्रेशर’शी

महाराष्ट्रात ‘निपाह’चा धोका नाही ; मात्र खबरदारी घ्या