फेसबुकवरील मैत्री ज्येष्ठ महिलेला पडली १२ लाखात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अंधेरीतील एका ६० वर्षीय महिलेला फेसबुकवरील मैत्री चक्क बारा लाखांना पडली. काही महिन्यांपुर्वी ४० वर्षीय व्यक्तीसोबत ओळख झाल्यानंतर त्याने आक्षेपार्ह फोटो कुटुंबियांना पाठविण्याची धमकी देऊन त्याच्या पत्नीसह बारा लाख रुपये उकळले. याप्रकरणी दुबईत राहणाऱ्या पती पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी ६० वर्षीय महिला अंधेरी परिसरात राहण्यास आहे. या महिलेची दुबईत राहणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तीसोबत फेसबुकवर ओळख झाली. त्यावेळी त्याने आपण दुबईत लेखापाल असल्याचे महिलेला सांगितले. त्यानतंर महिलेने तिच्या मुलाला दुबईत नोकरी लावण्याची विनंती त्याला केली. त्यानेही नोकरी लावण्याचे आश्वासन दिले. त्याने महिलेसोबत ऑनलाईन चॅटींग करण्यास सुरुवात केली. एका अप्लीकेशनच्या माध्यमातून तिला आक्षेपार्ह फोटो पाठविण्यास सांगितले.

महिलेने आधी नकार दिला. मात्र विश्वास वाढल्यावर तिने फोटो पाटिले. तो महिलेला भेटण्यासाठी मुंबईला आला. त्याने मुलाल नोकरी लावण्यासाठी तिच्याकडून पाच लाख रुपयांचा चेक घेतला. त्यानंतर महिलेला त्याच्या पत्नीने फोन करून धमकावण्यास सुरुवात केली. तिने त्याला पाठवविलेले फोटो तिच्या कुटुंबियांना पाठविण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्याकडून एकूण १२ लाख रुपये उकळले. त्यांची पैशांची मागणी सुरुच होती. त्यानंतर महिलेने प्रकार बहिणीला सांगितला आणि अंधेरी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. दाम्पत्य खरंच दुबईत राहतं का याचा तपास पोलीस करत आहेत.

ह्याहि बातम्या वाचा –

घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगार मावळमधून जेरबंद

‘मीदेखील लैंगिक शोषणाची शिकार’ : दंगल गर्लचा धक्‍कादायक खुलासा

आघाडीत स्वाभिमानीला दोन जागा ; राजू शेट्टी आघाडी सोबतच

 ‘या’ लोकसभा मतदार संघात काँग्रेसच्या यादीत असू शकते राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचे नाव 

काँग्रेसच्या ‘या’ बालेकिल्ल्यातच राहुल गांधींविरोधात ‘पोस्टरबाजी’