वारीत अन्‍नदान करण्यासाठी गेलेल्या महिलेचा चिरडून मृत्यू

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन

वारीत अन्‍नदान करण्यासाठी गेलेल्या महिलेचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शनिवारी घडली. कविता तोष्णीवाल असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव असून त्या महाबळेश्‍वर येथील एका कापड व्यवसायिकाच्या पत्नी होत्या. शनिवारी संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी लोणंदवरून फलटणला जात असताना ही घटना घडली आहे. रस्ता ओलांडताना ही दुर्देवी घटना घडल्याने हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.

[amazon_link asins=’B077Q42FWT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’49cb63d8-87fa-11e8-a7ed-e724b1dc4559′]

वारीत अन्‍नदान करण्यासाठी कविता या पत्नी आणि दोन लहान मुलांसह गेल्या होत्या. अपघाताच्या वेळी दोन लहान मुले देखील त्यांच्यासोबत होती मात्र ती सुदैवाने बचावली आहेत. त्या दोन लहान मुलांनी त्यांची आई अन्‍नदान करताना रस्ता ओलांडताना अपघातात मृत्यूमुखी पडल्याचे पाहिले. आईचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर मुलांचा आक्रोश पाहून वारकरी प्रचंड संतप्‍त झाले. वारकरी ट्रकचालकावर हावी होत असतानाच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि पुढील अनर्थ टळला. झालेल्या अपघाताची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात करण्यात आली. लोणंद पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. लोणंद पोलिस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, अन्‍नदान करण्यासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्‍त होत आहे तर दुसरीकडे तोष्णीवाल कुटूंबियांवर शोककळा पसरली आहे.