बालिकेचे अपहरण करणाऱ्या महिलेला अखेर अटक

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन 

आत्महत्या करणाऱ्या महिलेला एका कुटुंबाने आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले होते. एवढेच नव्हे तर तिला आपल्या घरात आसराही दिला. मात्र, याच कुटुंबातील दोन वर्षीय बालिकेचे त्या महिलेने अपहरण केल्याची खळबळजनक घटना मुंब्रा येथे घडली होती. याप्रकरणी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने २४ तासात अपहरणकत्र्या महिलेला अटक करुन बालिकेची सुखरुप सुटका केली. सुनिता उर्फ अंजली दादाराव जाधव (३३ रा. यवतमाळ) असे आरोपी महिलेचे नाव आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’68e85042-ca06-11e8-857d-f98b8827ccfe’]

मुंब्य्रातील ४२ वर्षीय तक्रारदार महिला बैतुल शेख यांचा मुलगा आसिफ २१ सप्टेंबर रोजी जळगाव येथून त्यांना भेटण्यासाठी येत होता. तेव्हा, पहाटेच्या सुमारास कल्याण येथे आरोपी महिला जीव देण्याचा प्रयत्न करत असताना तिला आसिफने अडवून जीव न देण्यापासून परावृत्त केले. तसेच, घरच्यांनी मारुन हाकलून दिल्याचे सांगितल्याने आसिफ तिला आपल्या मुंब्र्यातील घरी नेले. शेख कुटुंबाकडे आरोपी महिला मुलीप्रमाणे राहू लागली. याचदरम्यान ३ सप्टेंबर रोजी मायलेकामध्ये भांडण झाल्याने आई व मुलगा वेगळे राहू लागले. ३ ऑक्टोबर रोजी आसिफने आपल्या दोन वर्षाच्या मुलीला आईकडे राहण्यास पाठवले होते. ४ ऑक्टोबरच्या रात्री साडेआठच्या सुमारास अचानक चिमुकली नात रडू लागल्याने आरोपी महिलेकडे पाच रुपये देत, तिला दुकानावर चिप्स घेण्यासाठी पाठविले. याच संधीचा फायदा उचलून आरोपी सुनीता उर्फ अंजली हिने त्या चिमुकलीला घेवून पळ काढला.

[amazon_link asins=’B010U37EM8,B06WD4JFDP,B00278ZKTY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8f7a6db5-ca06-11e8-b875-454b9a036f78′]

याप्रकरणी युनीटचे सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांना आरोपी महिला बालिकेला घेवून सातारा येथे गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एक पथक सातारा येथे पाठविण्यात आले. तेथे गेल्यावर ती महिला यवतमाळ, दारव्हा येथील २ ते ३ व्यक्तींच्या संपर्कात असल्याची बाब पुढे आल्यानंतर, त्या व्यक्तींना पाढंरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांच्याकडून संशयित महिलेचा फोटो मिळवून शोध मोहीम सुरू केली असता, अपहरणकर्ती महिला पुणे-भुसावळ पेसेंजरने पुण्यातून निघाल्याचे समजले. त्यानुसार सहा पथकांद्वारे अथक प्रयत्न करुन अखेर तिला पनवेल येथे अटक करुन बालिकेची सुखरूप सुटका केली. या महिलेची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. तसेच, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या उपस्थितीत बालिकेला कुटुंबीयाकडे सोपवण्यात आले. ही कामगिरी ठाणे पोलीस आणि गुन्हे शाखेने केली असून आता या चिमुकलीला तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्त केले आहे.