सहाय्यक निरीक्षकासह महिला उपनिरीक्षक नियंत्रण कक्षाशी सलग्‍न

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

लॉज तपासणी करण्यासाठी गेलेल्या दिघी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिघी येथील वैभव लॉजमध्ये घुसून, तोडफोड करून, व्यस्थापकास मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्री घडला.  या प्रकरणात दिघी पोलीस ठाण्याच्या महिला उपनिरीक्षक दशवंत, सहायक निरीक्षक महेंद्र कदम आणि महेश खांडे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षाला बदली करण्यात आलेली आहे. ज्या लॉज मधील व्हिडीओ व्हायरल झाले आहे त्या लॉजवर पिटा ऍक्ट नुसार कारवाई झालेली आहे. तसेच मालक, कमगारांवर मारहाण, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, धमकी देणे असे गुन्हे दाखल आहेत.
[amazon_link asins=’B07D9G1GHB,B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a4b9c0f4-b35c-11e8-9fda-f3128b50dd3e’]

मिळालेल्या माहितीनुसार चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दशवंत यांना रात्रपाळी होती. तर सहायक निरीक्षक कदम यांना चाकण विभागात रात्र पाळी होती. तर महेश खांडे हे त्यांच्या सोबत होते. शुक्रवारी रात्री कदम, दशवंत आणि खांडे हे दिघी येथील वैभव लॉज मध्ये तपासणी साठी गेले होते. हा लॉज गुन्हे शाखेने पिस्तुल प्रकरणात अटक केलेल्या अवधूत जालिंदर गाढवे याचा आहे. लॉज तपासणी करताना १०२ क्रमांकाची खोली उघडून दाखव असे व्यवस्थापकास सांगितले. त्यावरून त्यांच्यात वाद झाले, व्यवस्थापकाने पोलिसांना आरेरावीची भाषा वापरली, यावरून चिडलेल्या पोलिसांनी त्या व्यवस्थापकास, कामगारांना मारहाण केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये दिघी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

जाहिरात

दि. 15 ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयाची सुरूवात झाली आहे. महिन्याभराच्या आतच पोलिस अधिकार्‍यांचे असे प्रताप जनतेसमोर आल्याने पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याचे काही पोलिस अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. दरम्यान, पोलिस अधिकार्‍यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. सहाय्यक निरीक्षक कदम, महिला उपनिरीक्षक दशवंत आणि खांडे यांनी केलेल्या मारहाणीचे संपुर्ण व्हिडिओ चित्रिकरण झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी हॉटेलमधील कर्मचार्‍यांना काही एक कारण नसताना बेदम मारहाण केली आहे.

जाहिरात

लॉज अथवा हॉटेलमध्ये काही बेकायदेशीर असल्यास पोलिस अधिकार्‍यांनी तात्काळ कारवाई करणे गरजेचे होते. मात्र, सहाय्यक निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांनी काही अधिकार्‍यांना सोबत घेवुन स्वतः हॉटेलमधील कर्मचार्‍यांना बेदम मारहाण केली आहे. बेदम मारहाण करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांना केवळ नियंत्रण कक्षाशी सलग्‍न करून चालणार नसुन त्यांच्याकडे कठोर कारवाई व्हावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे. चाकण सहाय्यक आयुक्‍त  यांच्या चौकशी अहवालानंतरच पोलिस अधिकार्‍यांवरील कारवाईबाबत ठरणार आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या सीसीटीव्ही फुटेजचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

इतर बातम्या

वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे ‘कामकाज’ पाहणार्‍या कर्मचार्‍यांवर गुन्हा 

मुस्लीम मुक मोर्चादरम्यान पुण्यातील वाहतूकीत बदल 

कमर बाजवांचा बाजा मोदी वाजवणार का? : शिवसेना 

You might also like