वीजेची तार पडून महिलेचा मुत्यू 

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – शेतात काम करीत असताना अंगावर विजेची तार पडून महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नाशिक तालुक्यातील शेवगे दारणा परिसरात गुरुवार दि. १४ फेब्रुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शेवगे दारणा भागात राहणाऱ्या हौसाबाई सुरेश कासार (वय ५२) या त्यांच्या शेतात गव्हाला बारे देत होत्या. त्याच वेळी त्यांच्या शेतावरुन गेलेल्या वीजेच्या तारा एकमेकांना चिटकल्याने त्या तुटून हौसाबाई यांच्या अंगावर पडल्या. यामध्ये त्यांना विजेचा जोरदार धक्का बसून यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना नाशिकरोड पोलिसांना कळली असता, त्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. या घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलिस निरीक्षक जगदीश शेलकर करीत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Loading...
You might also like