‘कोरोना’ कालावधीत शासकीय यंत्रणेचे काम कौतुकास्पद ! फुरसुंगीतील प्रज्ञा विद्यालयामध्ये कोरोना योद्ध्यांचा सन्मान

पुणे : कोरोनाच्या कालावधीमध्ये पोलीस, महापालिका, जिल्हा परिषद, वृत्तपत्र, अत्यावश्यक सेवा देण्यात अनेकांचे मोठे योगदान लाभले. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना काम करण्याची ऊर्जा मिळावी यासाठी शासनाच्या आदेशानुसार कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला, असे नवचैत्नय मित्रमंडळ संचालित प्रज्ञा शिशु विहार व प्राथमिक आणि रमणलाल शहा माध्यमिक विद्यालयाचे सचिव बळीराम बडेकर यांनी सांगितले. फुरसुंगीमधील नवचैतन्य मित्र मंडळ संचालित प्रज्ञा शिशु विहार, प्रज्ञा प्राथमिक विद्यालय, रमणलाल शहा माध्यमिक विद्यालयामध्ये २६ जानेवारी 2021 रोजी ७२ वा प्रजासत्ताक साजरा करण्यात आला.

याप्रसंगी हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजू अडागळे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे, पोलीस उपनिरीक्षिका मोहिनी डोंगरे, सहायक पोलीस फौजदार महेंद्र बडेकर, दामिनी मार्शल सारिका घोडके, पोलीस नाईक के.एम. लोणकर प्रफुल्ल साबळे, पुणे मनपाच्या वैद्यकीय अधिकारी स्नेहा जगताप, आरोग्य कोठीप्रमुख दत्तात्रय पोळ, संस्थेचे अध्यक्ष अशोक सुरवसे, सचिव बळीराम बडेकर, संगम गायकवाड, सुधीर बडेकर, संचालक, मुख्याध्यापिका, शिक्षक व पालक उपस्थित होते. यावेळी करोना योद्ध्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालयाच्या वतीने ऑनलाईन भाषण व देशभक्ती गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यातील प्रथम क्रमांकाची भाषणे व देशभक्तीपर गीते ऐकवण्यात आली.

संतोष हिंगणे व दिपाली आरडे यांनी सूत्रसंचालन केले.