जगातील सर्वात मोठ्या घुमटाची पुण्यात निर्मिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
जगातील सर्वात मोठ्या व्यासाच्या घुमटाची निर्मिती पुण्यातील एमआयटी शिक्षण संस्थेकडून करण्यात आली आहे. या संस्थेने पुण्याजवळील लोणी काळभोरमधे उभारलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज प्रार्थनागृहाचा घुमट, हा १६० फूट व्यासांचा आहे, तर या प्रार्थनागृह २६३ फूट उंचीचे आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d8f0fa2a-bd98-11e8-858b-fba931c15bbe’]
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स् एमआयटी, पुणे, भारत चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॅा. विश्वनाथ दा. कराड यांच्या संकल्पनेच्या माध्यमातून लोणी काळभोर पुणे येथे अतिविशाल असे ‘वर्ल्ड पीस लायब्ररी अॅण्ड प्रेअर हॅाल’ उभारण्यात आला आहे. त्याचाच कळस म्हणून हा जगातील सर्वात मोठा घुमट बांधण्यात आला आहे.
सर्वधर्म समभावाचा संदेश देण्यासाठी या घुमटाची निर्मिती करण्यात आल्याचं एमआयटीने म्हटलं आहे . कारण या प्रार्थनागृहात जगभरातील तत्त्ववेत्ते आणि महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. येत्या दोन ऑक्टोबरला म्हणजे गांधी जयंतीच्या निमित्ताने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या हस्ते या प्रार्थनागृहाचे उद्घाटन केले जाणार आहे.
‘सारथी’च्या तक्रारींचे क्रॉस चेकिंग; सत्तारूढ पक्षनेत्यांनी नागरिकांकडून घेतला फीडबॅक
आतापर्यंत ख्रिस्ती धर्मीयांचं सर्वात मोठं तीर्थस्थळ असलेल्या व्हॅटिकनमधील चर्चच्या घुमटाचा व्यास हा सर्वाधिक म्हणजे १३६ फुटांचा होता. मात्र विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी उभारलेल्या लोणी काळभोरमधील सभागृहाचा घुमट आता जगातील सर्वात मोठा घुमट ठरणार आहे.
प्रार्थना सभागृहासाठी त्याचा वापर होणार असून येथे एकाच वेळी साडेतीन हजार लोक राहू शकतील. या गोलघुमटाचे बांधकाम सुरू २०१६ साली सुरु करण्यात आले होते .या घुमट बांधकामासाठी संस्थेने एक विशिष्ट बांधकाम शैली स्वत: विकसित केली असून, त्याला ‘एमआयटी टेक्निक’ असे नाव देण्यात आले आहे.
पुणे/पिंपरी : अनैतिक संबंधातून सावत्र भावाचा खून
[amazon_link asins=’B01F7AX9ZA,B0748NPV86′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’93c7a284-bd99-11e8-9469-f99c2bd7fdab’]