home page top 1

तरुणाने वाहतूक शाखेतच अर्धनग्न होऊन घातला गोंधळ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – वाहतूक पोलिसांनी नो-पार्किंग मधील दुचाकी टोईंग करून नेल्याने एका तरुणाने दुचाकी टोईंग करून नेलीच का असे म्हणत वाहतूक शाखेच्या कार्यालयात अर्धनग्न होत गोंधळ घातला असल्याची घटना घडली आहे. त्यासंदर्भात एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वाहतूक पोलिसांचे वाहन टोईंग करून नेने हा विषय सध्या नाशिक मध्ये वादाचा विषय झाला आहे. याचदरम्यान, वाहतूक पोलिसांनी आणि वाहन टोईंग करणाऱ्या ठेकेदारांनी नो पार्किंग मधील दुचाकी टोईंग करून नेल्याने एका तरुणाने दुचाकी टोईंग करून नेलीच का असे म्हणत वाहतूक शाखेच्या कार्यालयात अर्धनग्न होत गोंधळ घातला. इतकेच नव्हे तर, तब्बल ३० मिनिटे हा गोंधळ चालला. याचबरोबर अर्धनग्न होऊन गोंधळ घालणाऱ्या त्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ व्हायरल झाल्याने नाशिकमध्ये परत एकदा टोईंगचा विषय चर्चेत आला आहे.

Loading...
You might also like