Bhosari News : प्रेमसंबंधाच्या कारणावरुन तरुणाच्या गळ्यावर कटरने वार

भोसरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रेमसंबंधाच्या कारणावरून एका तरुणाच्या गळ्यावर कटरने वार केल्याची धक्कादायक घटना भोसरी येथे घडली आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना भोसरी येथील टेल्को रोडवर शुक्रवारी (दि.1) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास घडली.

अभिषेक उर्फ आकाश मधूकर कांबळे (वय-26) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर किरण शिवाजी थोरात (वय-23 रा. बालाजी नगर झोपडपट्टी भोसरी) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शुभम मधूकर कांबळे (वय-20 रा. बालाजी नगर झोपडपट्टी, भोसरी) याने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास जखमी अभिषेक आणि आरोपी मित्र हे दोघेजण दुचाकीवरून इंद्रायणीनगर कडून बालाजीनगरकडे जात होते. त्यावेळी प्रमसंबंधाच्या कारणावरुन आरोपी किरण याने त्याच्याकडे असलेल्या कटरने अभिषेकचा गळा कापून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी किरण विरोधात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंचमुख करीत आहेत.