मुंबई-ठाण्यासह पुणे-पिंपरीतील सिनेमागृहे, नाट्यगृहे आज मध्यरात्रीपासून बंद : मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे, मुंबई, नागपूर आणि ठाण्यातील एकुण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 17 झाली असून याच पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज अंत्यत महत्वाची घोषणा केली आहे. पुणे, ठाणे, मुंबई, नवी मंबई आणि पिंपरी-चिंचवड येथील जीम, सिनेमागृहे, जलतरण तलाव, नाट्यगृह आज (शुक्रवार) मध्यरात्रीपासून बंद करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विधानसभेत केली आहे. तसेच लोकांनी रेल्वे तसेच बसचा प्रवास काम नसल्यास करू नये आणि मॉलमध्येही जाणं टाळावं असे आवाहन त्यांनी केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाला महामारी म्हणून काल (गुरूवार) घोषित केले आहे. कोरोनाबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी विधानसभेत निवेदन दिलं. राज्यात एकुण 17 कोरोना बाधित रूग्ण असून त्यांची कोरोनाची लक्षणं गंभीर नाहीत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे त्यांनी सांगितले. सिनेमागृहे, जलतरण तलाव, नाटयगृहे आज मध्यरात्रीपासून बंद करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी 14 दिवस काळजी घ्यायला हवी म्हणून निर्णय घेण्यात आला आहे.