सराईत वाहनचोर अटकेत, ७ गुन्हे उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – टिंबर मार्केट परिसरातून वाहने चोरणाऱ्याला खडक पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ७ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

अल्पेश शरीफ मुलाणी (२३, रा. लोहियानगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. वाहन चोरी करणारा मुलाणी बाबत पोलिस कर्मचारी समीर माळवदकर आणि संदीप कांबळे यांना माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक आयुक्त प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव, निरीक्षक (गुन्हे) उत्तमराव चक्रे, सहाय्यक निरीक्षक उमाजी राठोड, कर्मचारी विनोद जाधव, गणेश सातपुते, संदीप पाटील, प्रमोद नेवसे, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, संदीप कांबळे, रवी लोखंडे, विशाल जाधव, रोहन खरे, इमरान नदाफ आणि सागर केकान यांच्या पथकाने आरोपीला सापळा रचुन अटक केली.

आरोपीकडून खडकच्या हद्दीतील ३, दत्तवाडी, सहकारनगर, कोथरूड आणि अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक एक असे एकुण ७ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे. आरोपी नदाफकडून ३ लाख १० हजार रूपये किमतीची ७ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like