home page top 1

लिफ्टच्या बहाण्याने लुटणार्‍यांना पुणे ग्रामीणच्या LCB कडून अटक

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन –  शिक्रापुर (ता. शिरूर ) हद्दीत एका इसमाला लिफ्टच्या बहाण्याने लूटणार्‍या चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (ग्रामीण) पोलिसांनी रविवारी (ता. २२ ) जेरबंद केले. अमोल अशोकराव मुंडे, व गणेश वशिष्ठ जाधव (वय -२६ रा. कोयाळ, ता. धारूर, जी. बीड ) व महादेव उर्फ महाडू तुकाराम गडदे (वय- २३, रा. चिंचकंडी, ता. आंबेजोगाई जि. बीड, असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे सात लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी सुदाम शंकर पोपळघट (रा. वाळूंज जि. औरंगाबाद) हे २७ ऑगस्ट रोजी औरंगाबादकडे जात असताना शिक्रापूर या ठिकाणी चहाच्या टपरीवर थांबले होते. अनोळखी चार इसमांनी आमच्या माणसाची तबब्येत ठीक नाही आम्हाला अहमदनगर पर्यंत तुमच्या गाडीतून येउद्या असे म्हणून गाडीत बसले. गाडी अहमदनगर जवळील टोलनाक्यावर थांबवून चाकूने वार करून हातपाय बांधून, जवळील लॅपटॉप, मोबाइल फोन, रोख रक्कम व त्याच्या जवळील चारचाकी गाडी घेऊन पाथरी (जि. परभणी ) या ठिकाणी सोडून निघून गेले.

पद्माकर घनवट यांना एका खबर्‍या मार्फत माहिती मिळाली की, सदरचे आरोपी हे वंजारवाडी ता. परळी जी. बीड. या ठिकाणी आहेत. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, दत्तात्रय जगताप, दयानंद लिमन, पोलिस हवालदार उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, पोलिस नाईक विजय कांचन, रउफ इनामदार, राजू मोमीन, जनार्दन शेळके, धिरज जाधव बाळासाहेब खडके यांनी एक पथक बनवले त्यानुसार त्याठिकाणी जाऊन कारवाई केली असता आरोपी पोलिसांना पाहून पळून जाऊ लागले. मोठ्या शिताफीने पोलिसांनी तीनही आरोपींना जेरबंद केले.

Visit – policenama.com 

Loading...
You might also like