पुण्यातील ‘त्या’ नगरसेवकाची फॉर्चूनर राजस्थानमध्ये सापडली ; सराईतांनी फॉर्चूनर वापरली गांजाच्या तस्करीसाठी

पुणे :पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील नगरसेवक दीपक पोटे यांच्या घरासमोरून चोरून नेण्यात आलेली फॉर्चूनर गाडी राजस्थानात सापडली असून त्या गाडीचा वापर चोरट्यांनी गांजा तस्करीसाठी केल्याचे समोर आले आहे. दत्तवाडी पोलिसांनी राजस्थानातील एका सराईताला अटक केली आहे.

हिरामन उर्फ हरिश चिंमणाराम उर्फ चिमाराम जाट (रा. कोलू महेचा , राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर त्याचे दोन साथीदार सुनील उर्फ चुन्नीलाल उदाराम जाट (रा. राजस्थान), सागर हरिराम बिष्णोई (रा. राजस्थान) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक पोटे यांच्या घरासमोरून पळविली होती फॉर्चूनर

पुणे महानगरपालिकेतील नगरसेवक दीपक पोटे यांच्या सिंहगड रोड परिसरातील घरासमोर पार्क केलेली फॉर्चूनर चोरट्यांनी लंपास केली होती. २४ जानेवारी रोजी हा प्रकार उघडकिस आला होता. याप्रकऱणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. या घटनेने संपुर्ण शहरात खळबळ उडाली होती.

राजस्थानात सापडली गाडी

पोटे यांची फॉर्चूनर अवैध धंद्यांसाठी करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी राजस्थान आणि पंजाब पोलिसांना याची माहिती दिली होती. दरम्यान राजस्थान पोलिसांनी लुणी येथे ही फॉर्चूनर पकडली. गांजाची अवैध तस्कारी करत असताना ही गाडी पकडण्यात आली होती. तपासात ही गाडी पोटे यांची असल्याचे समोर आले. तेव्हा राजस्थान पोलिसांनी पुणे पोलिसांना संपर्क साधून याची माहिती दिली. तेव्हा दत्तवाडी पोलिसांनी तेथे जाऊन हिराराम याला अटक केली.

गांजाच्या तस्करीसाठी वापरली फॉर्चूनर

हिरामन याच्याकडे तपास केल्यावर त्याने गुन्ह्याची कबूली दिली. पुण्यातून त्यांची फॉर्चूनर चोरून ती बनावट नंबर प्लेट लावून वापरली. तिचा वापर त्याने गांजा विक्रीसाठी केल्याचे सांगितले. हिरालालवर गुन्हे दाखल आहेत. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला १० दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.