स्टेशनरी साहित्य चोरून नेले : दरोड्याचा गुन्हा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पाथर्डी तालुक्यातील टाकळीफाटा येथे बाबासाहेब घुले यांना मारहाण केल्याबाबत पोलिसांत जबाब नोंदविल्याचा राग येवून बाबासाहेब घुले यांना 8 जणांना मारहाण करून जबरदस्तीने दुकानातून स्टेशनरी साहित्य चोरून नेल्याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, बाबासाहेब विठ्ठल घुले (रा. कोरडगाव) यांचे टाकळीफाटा येथे पानटपरी असून २५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता गोकुळ फुंदे याने टपरी समोर मोटर सायकल लावली दुपारी तीन वाजता अमोल फुंदे यास मोटारसायकल नेऊ नको, असे सांगितले असता फुंदे याने फिर्यादीला मारहाण केली होती. त्याबाबत अहमदनगर येथील दवाखान्यात उपचार घेताना पोलिसांनी बाबासाहेब घुले याचा जबाब नोंदवला होता.

त्यानंतर ३० एप्रिल रोजी रात्री ११ वाजता आरोपी बाळासाहेब भिवा केकाण, विकास बांगर, खंडू दिनकर केकाण व इतर पाच अनोळखी आरोपींनी अमोल फुंदे याचे विरुद्ध पोलिसात का जबाब नोंदवला असे म्हणून बाबासाहेब घुले यांना लोखंडी फाईट, लाकडी दांडा, कुलूप याच्या सहाय्याने बेदम मारहाण करत टपरीत विक्री करिता ठेवलेले रेबन कंपनीचे ५,०४० रुपये किमतीचे गॉगल तसेच ५२५ रुपयाचे किंमतीची चेन असा एकूण ५,५६५ रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेले असून घटनेचे सीसीटीव्हीमध्ये चित्रीकरण झाले आहे.

याबाबत गेल्या दोन महिन्यापासून अनेकदा पोलीस ठाण्यात चकरा मारूनही फिर्याद नोंदवली जात नसल्याने सोमवारी फिर्यादी घुले यांनी अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर अखेर रात्री उशिरा फिर्याद दाखल झाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात

रूग्ण वेळेत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला आता ‘यल्लो कॉरिडोर’

वजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा

ठाण्यातील ६६ वर्षीय ब्रेनडेड महिलेचे अवयवदान