घरफोडीत साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – भिस्तबाग चौकातील गजराज फॅक्टरी जवळ झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी घरफोडी केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, नितीन रघुनाथ वट्टमवार (रा. शिवरंजन रिजन्सी, भिस्तबाग चौक, नगर) हे गुरुवारी दुपारी दोन वाजता घराच्या दरवाजास कुलूप लावून बाहेर गावी गेले होते. रविवारी दुपारी साडेचार वाजता घरी परतले असता त्यांना दरवाजाची कडी तोडलेली दिसली. चोरट्यांनी लोखंडी कपाट फोडून आतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 3 लाख 52 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
चोरीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हारूण मुलाणी आदींनी घटनास्थळी भेट दिली.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात नितीन वट्टमवार यांच्या फिर्यादीवरू अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील हे करीत आहेत.
Loading...
You might also like