नेवासा : बँकेच्या कॅश काऊंटरवरून रोकड चोरली

नेवासा (जि. नगर) : पोलीसनामा ऑनलाइन – बँक खात्यात भरणा करण्यासाठी नेलेली ऐंशी हजाराची रक्कम बँकेतूनच अज्ञात चोरट्याने लांबवली. याबाबत श्रीकृष्ण नरहर जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नेवासा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर हकीगत अशी आहे की, सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास श्रीकृष्ण जोशी (रा.मारुती चौक. नेवासा) हे शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आपल्या मुलाच्या खात्यात ऐंशी हजार रुपये भरण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांनी दि.२१ सप्टेंबर रोजी एफडीची पावती घेण्यासाठी बँकेतील काउंटर क्रमांक पाच जवळ ते उभे होते. त्यावेळी बँकेत मोठी गर्दी होती. त्यांच्या जवळ असलेली पैशांची पिशवी त्यांनी काउंटरच ठेवली व पावतीची विचारपूस करत असताना त्यांच्या थोड्या वेळाने लक्षात आले की काउंटरवर ठेवलेली पिशवी तेथे नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. त्यावेळी त्यांनी बँकेचे मॅनेजर यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी ही शोध घेतला. मात्र ती पिशवीतील रक्कम मिळून नाही.

चोरट्याने सदर रक्कम चोरल्याची त्यांना खात्री झाली असल्याचे श्रीकृष्ण जोशी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तुळशीराम गीते करीत आहे.

Visit : policenama.com