चार दिवसांपुर्वी आलेल्या नोकराने गल्ला लुटला अन दुचाकीही नेली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चार दिवसांपुर्वीच कॅफेवर कामाला आलेल्या नोकराने गल्ला तर साफ केलाच पण एका सहकार्‍याची दुचाकीही चोरून नेल्याची घटना घडली. या नोकराला गुन्हे शाखेच्या युनिट चारने सापळा रचून अटक केली. उर्जीतसिंह वसंत निंबाळकर (वय 47, रा. सेनापती बापट रोड) असे अटक करण्यात आलेल्या नोकराचे नाव आहे. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सेनापती बापट रस्त्यावरी हॉटेल मॅरियेटच्या पाठीमागील बाजूस क्रिस्तो कॅफे आहे. घटनेच्या चार दिवसांपुर्वी निंबाळकर हा या ठिकाणी कामाला आला होता. निंबाळकर याला मद्यपानाचे व्यसन आहे. रात्री निंबाळकर याने गल्ल्यातील 22 हजार रुपये घेतले आणि सहकारी असणार्‍या एकाची होंडा सीबी ट्विस्टर दुचाकी घेऊन पसार झाला. काही वेळाने हा प्रकार लक्षात आल्यानंतर कॅफे मॅनेजरने पोलीसांकडे धाव घेतली.

या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा करत होती. यावेळी पोलीस कर्मचारी विशाल शिर्के, दत्तात्रय फुलसुंदर, गणेश काळे आणि सचिन ढवळे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी हा त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी येणार आहे. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक अंजुम बागवान व त्यांच्या पथकाने याठिकाणी सापळा रचून त्याला अटक केली. त्याला दारूचे व्यसन आहे. त्यातून त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like