चाकणमधील कंपनीत लाखोंची चोरी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – खेड तालुक्यातील कुरुळी येथे असणाऱ्या प्रोफाईव्ह इंजिनिअरिंग प्रा. लि. या कंपनीच्या पत्र्याचे नट-बोल्ट खोलून चोरट्यानी चार लाख ११ हजार ७१२ रुपयांचा ऐवज चोरुन नेला. यामध्ये वेल्डिंग मशीनच्या केबल, कनेक्टर आणि लग्ज याचा समावेश आहे.

पुण्यात भरदिवसा घरफोडी

याप्रकरणी तुषार श्रीराम वाडेकर (३५, रा. वारजे माळवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार यांची खेड तालुक्यातील कुरुळी येथे प्रोफाईव्ह इंजिनिअरिंग प्रा. लि. ही कंपनी आहे. रविवारी कंपनी दुपारी पाच वाजता बंद केली. त्यानंतर रात्री अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या पत्र्याचे नट-बोल्ट खोलून पत्रा वाकवला. त्यावाटे कंपनीत प्रवेश करून कंपनीत असलेले ४७ वेल्डिंग मशीनच्या केबल, केनेक्टर व लग्ज असा एकूण ४ लाख ११ हजार ७१२ रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. तपास चाकण पोलीस करीत आहेत.