अजबच …. चोरांनी पैसे, दागिणे नाही तर चोरले ‘काजू-बदाम’

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात चोरी सञ सुरुच आझाद नगर हद्दीतील एका दुकानातून चोरट्यांनी चक्क काजु, बदाम व सिसीटीव्ही फुटेज कव्हर करणारे. 2 DVR चोरट्यांनी लंपास केले.
सविस्तर माहिती की, शहरातील मुख्य बाजार पेठ परिसरातील उस गल्लीत व्यापारी गिरीष नानकराम तलरेजा यांच्या मालकीचे द्वारकामाई कॉम्प्लेक्स मधील तळ घरात सीमा हॉटेल्स वर्ल्ड होलसेल किरणा साहित्य विक्रीचे दुकान आहे.अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटरचे कुलूप तोडुन दुकानात प्रवेश करुन चोरट्यांनी मध्यराञीतून हजारोंचा माल लुटून नेला.

गेला माल-
1) 11,000/- रु रोख काउंटर मधील गल्ल्यात ठेवलेले.
2) 12,000/-र कठिमतीचे काजु 10 किलो 5किलो पॅकिंग पिशवी शोकेज मध्ये
ठेवलेले.
3) 10,000/-रु किंमतीचे बदामाच्या 1 किलोच्या 15 पिशव्या शोकेज मध्ये ठेवलेले.
4) 5,000/- रकिंमतीचे सीसीटीव्ही फुटेज सेव्ह करणारे 02 DVR दुकानाच्या
शोकेज मध्ये ठेवलेले

एकुण-38,000/-

डिव्हीआर चोरट्यांनी लंपास केल्याने चोरट्यांनचा शोध लावण्याचे आव्हान पोलीसांसमोर आहे.व्यापारी वर्गात चोरीसञामुळे भितीचे वातावरण आहे.

या प्रकरणी गिरीष तलरेजा यांनी आझाद नगर पोलीसांत फिर्याद नोंद केली आहे.

आझाद नगर पोलीस स्टेशनला.गुरन281/2019भादंवि कलम-380,457प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

काल जिल्हा परिषद सेवानिवृत्त जिल्हा परिषद केंद्र प्रमुख संतोष कृष्णा पाटील.रा.गोंदुर रोड घरातून दहा तोळे सोने,रोख 25,000 हजार चोरट्यांनी लुटून नेले.पश्चिम देवपूरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पो.कॉ.डि आर पाटील करत आहे.

 

You might also like