धारदार शस्त्र हातात घेत दहशत माजवत सलग सातव्या दिवशी लाखोंचा ऐवज लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत. आज शनिवार (9 नोव्हेंबर) पहाटेच्या वेळी चोरट्यांनी पांडव प्लाझा येथील बंद फ्लॅटमधील लाखो रुपयांचे दागिने लंपास केले. हा फ्लॅट महेश मालपाणी यांचा आहे. ते राजस्थानला गेले असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरातील दागिने लंपास केले. मालपाणी यांसह आठवड्यात अनेकांच्या घरी चोरी झाल्याच्या घटनांची शहर पोलीस स्टेशन व चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

धारदार शस्त्र हातात घेऊन दहशत माजवत चोरटे चोऱ्या करत आहेत. अमरसिंह हजारे यांच्या घरात चोरी करत चोरट्यांनी 70 हजार रुपयांचे सोन्या चांदिचे दागिने लंपास केले. तसेच लुकराम यांच्या घरातीलही हजारो रुपयांचे दागिने लंपास केले. तसेच शैलेश गौड यांच्या घरातून रोख रक्कम ११ हजार व सोन्याचे दागिने लंपास केले. गौड हे मुंबईला गेले होते.

चाळिसगाव रोड दसेरा मैदान जवळील अपार्टमेंट मध्ये चोरी करत असताना काही जणांनी चोरट्यांना पाहिले. त्यांनी चोरांना पाहून आरडा-ओरडा करत असताना चोरांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि चोरटे पसार झाले. चोरी करताना चोरटे वेगवेगळ्या कारचा वापर करत आहेत. चोरट्यांची एक कार चित्तोड गावाजवळ बेवारस स्थितीत पोलीसांना सापडली आहे. तसेच पाच चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Visit : Policenama.com 

You might also like