‘धूम’ स्टाईलने महिलेला लुबाडले

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धूम स्टाईलने मोटरसायकलवरून चोरट्यांनी रस्त्याने चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केले. ही घटना एस.बी.आय काॅलनी जवळ देवपूर येथे घडली. या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुलभा भरत कुलकर्णी (४६, भगतसिंग नगर, मालेगाव) असे महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, सुलभा कुलकर्णी या मुळच्या मालेगाव येथील असून काही दिसांकरिता देवपूर येथे मुलीकडे राहण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी रस्त्याने चालत जात असताना दोन अज्ञात चोरटे मोटारसायकलवरुन येऊन त्यांनी सुलभा यांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावले आणि तेथून पळ काढला. त्यानंतर महिलेने आरडाओरडा केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. त्यानंतर महिलेने देवपुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र चोरल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध देवपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो.नि.एन.डी सानप करीत आहेत.

Loading...
You might also like