धुळे : बस स्थानकात चोरी, महिलेच्या बॅगेतील सोन्याचे दागिने लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनालईन – शहरातील बस स्थानकात चोरीचे प्रमाण वाढले आहे. बसची वाट पाहत थांबलेल्या सेवानिवृत्त वृध्द दांम्पत्याच्या बॅगमधील हजारो रुपयांचे सोनेचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जगन्नाथ शंकर वडनेरे (वय ७१,रा.प्रभात नगर, देवपूर, धुळे) यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वडनेरे दांम्पत्या धुळे येथील बस स्थानकात बसची वाट पाहत थाबले होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्या बॅगमधील ९० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. त्यामध्ये ४ तोळे सोन्याचे दागिने, ५ तोळे सोन्याची मंगल पोत, नथ, असे एकून ९० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. बस स्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस चौकी हे फक्त आता शोभेची वस्तू बनले आहेत. बस स्थानक परिसरात सतत चोरीच्या घटना घडतात मात्र पोलीसांकडून याबाबत कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. पुढील तपास पो.नि.गणेश चौधरी करत आहे.

‘नासलेलं दूध’ही आहे सौंदर्यवर्धक ; जाणून घ्या फायदे

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

काय सांगताय ! मेहंदी केवळ ‘सौंदर्यच’ नाही तर ‘आरोग्यही’ खुलवते

मेंदूलाही असते व्यायामाची गरज, मानसिक उर्जेसाठी आवश्यक

पावसाळ्यात घ्या अशी काळजी, अरोग्य राहील चांगले