धुळे जिल्ह्यात ‘दुहेरी चोरी’ ; चोरीच्या प्रकरणांचा आलेख वाढताच

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यात चोरी सत्र सुरुच आहे. आज बुधवारी नरढाणा, नगाव गावात सोन्यांचे दागिनेसह लाखो रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. नगाव गावातील लँब असिस्टन्टचे बंद घराचा फायदा घेत चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने लंपास केले.

सविस्तर माहिती की, बन्सीलाल पाटील हे नगाव गावापासून काही दुर अंतरावर असलेल्या गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालयात लँब असिस्टन्ट म्हणुन नोकरी करतात. त्यांची स्वतःची शेती आहे. ती ते खेडतात नेहमी प्रमाणे आज बुधवारी सकाळी नवरा बायको शेती कामासाठी शेतीकडे गेले होते. मुलगा अर्धा तासांनी क्लास गेला. जाण्यापुर्वी त्याने घराचे दाराला कुलूप लावून किल्ली अंगणातील तुळशी वृंदावनात ठेवली होती. बंद घराचा फायदा घेत चोरट्याने कुलूप उघडून घरात प्रवेश करुन घरातील लोखंडी कपाट फोडुन कपाटातील आतील कप्प्यातील डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने मंगल पोत, सोन्याचे टोंगल, सोन्याची अंगठी, सोन्याच्या कानातील रिंगा, सोन्याच्या बांगड्या ३ लाख ६६५४ रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले.

गावात भरदिवसा गजबलेल्या भागात चोरी झाल्याने आश्चर्यच व्यक्त केले जात आहे. दुपारी बन्सीलाल पाटील शेतीची कामे आटोपून गावात घरी पोहचले. घराचे कुलूप उघडून पाहिले आत पाहिले असता बेडरुम मधील साहित्य खोलीत जमिनीवर फेकलेले होते. आत डोकावून पाहिले असता लोखंडी कपाट उघड दिसले. घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. पोलीसांना चोरी माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीसांनी पहाणी केली. तपासकामी मदतीसाठी श्वान पथक, फिंगर प्रिंट तज्ञांची मदत घेण्यात आली. श्वानाने गावापासून काही अंतरावर असलेल्या महामार्गापर्यतच मार्ग दाखवला. महामार्ग रस्त्याजवळ श्वान घुटमळत राहिले. गावात चोरी झालेल्या घराबाहेर परिसरात बघ्यांची गर्दी जमा झाली होती.

औद्योगिक वसाहतीतील केमिकल कंपनीत चोरी

दुसरी घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. नरढाणा येथील आर. एम. फॉस्पेट अँण्ड केमिकल प्रायव्हेट कंपनीत चोरी झाली. काल मंगळवारी नेहमी प्रमाणे कामकाज आटोपून कार्यालय बंद करुन कर्मचारी घरी निघुन गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांने कंपनीच्या आवारात प्रवेश करुन खिडकीतील ग्रिल तोडून कंपनीतील कार्यालयात प्रवेश करुन लाकडी कपाट फोडुन आत ठेवलेली लोखंडी तिजोरी कंपनीतील आवारातील काटेरी झुडपाजवळ नेऊन ती फोडुन त्यातील अंदाजे १ ते दिड लाख रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. चोरी बाबत शिंदखेडा पोलीसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीसांनी पहाणी केली. तपास कामी फिंगर प्रिंट तज्ञ, डॉग स्कॉडची मदत घेण्यात आली. सिसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरट्यांना शोधणे हे पोलीसांसमोर मोठे आव्हानच आहे.

ह्या अगोदरही एका तार कंपनीत चोरी प्रकार घडला आहे. तेथील वॉचमनला चोरट्यांनी मारून टाकून जवळील खड्ड्यात पुरण्याचा प्रयत्न करत लाखो रुपयांची रक्कम लंपास केली होती. त्याचा तपास अजून लागला नाही. या प्रकरणी कंपनीचे मँनेजर यांनी लेखी तक्रार दिली आहे. उशीरा पर्यत शिंदखेडा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.

आरोग्यविषयक वृत्त