धुळे : शेतकऱ्याचे गोडावून फोडून हजारो रुपयांच्या धान्याची चोरी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात चोरीसत्र सुरुच आहे. चोरट्यांनी कुसूंबा गावातील शेतकऱ्याचे ध्यान्याचे गोडावून फोडून हजारो रुपयांच्या धान्याची चोरी केली. याप्रकरणी शेतकरी गजानन जिरे यांनी सोनगीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सविस्तर माहिती अशी की, कुसूंबा गावात राहणारे शेतकरी गजानन जिरे यांचे शेतात धान्य साठवण्याचे गोडावून आहे. यामध्ये भुईमुग, हरभरा, बाजरी, कापुस असा माल त्यांनी पोत्यात साठवलेला होता. अज्ञात चोरट्यांनी गोडावूनला लावले कुलूप तोडून 69,000 हजार रुपयांचा धान्यसाठा चोरुन नेला.

रात्रीच्यावेळी शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी जिरे शेतात आले असता गोडावून उडघे दिसले. चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी चोरी बाबत पोलीसांना माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी पहाणी करून तपास सुरू केला आहे. गजानन जिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोनगीर पोलीसांत अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील करत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/