कल्याणीनगर परिसरात बोलावून 7 हजार अमेरिकन डॉलर घेऊन केला पोबारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कल्याणीनगर भागात एकाला परदेशी चलन घेऊन बोलवत त्याच्या हातामधील सात हजार अमेरिकन डॉलर घेऊन एकाने पोबारा केला. त्या व्यक्तीला एका खोलीत बंद करून चोरटा पसार झाला आहे. बुधवारी रात्री उशिरा घटना घडली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात संकेत गावडे (वय ३१, कासारवाडी ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार एका कंपनीत काम करतात. त्यांची कंपनी परदेशी चलन बदलून देते. एखाद्या व्यक्तीला परकीय चलनाची आवश्यकता असल्यास त्यांची कंपनी त्या व्यक्तीला परकीय चलन बदलून देते. फिर्यादींच्या कंपनीत आरोपीने फोन केला. तसेच परदेशात जायचे असून अमेरिकन डॉलरची आवश्यकता असल्याचे सांगितले. परकीय चलन घेऊन कल्याणीनगर येथील वेस्ट व्ह्यू अपार्टमेंट येथे बोलविले व सात हजार अमेरिकन डॉलर आणण्यास सांगितले.

फिर्यादी परकीय चलन देण्यास गेले. त्यावेळी आरोपीच्या खोलीत गेल्यानंतर आरोपीने त्याना डॉलरची विचारणा केली. त्यांनी डॉलर काढून हातात दाखविले. त्यावेळी आरोपीने त्यांच्या हातामधील सात हजार रूपयांचे अमेरिकन डॉलर हिसकावून घेत खोलीतून बाहेर पळाला. तसेच बाहेरून कडी लावले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी परदेशी चलन घेऊन आलेल्या एकाला धायरीत अशा पद्धतीने लुटले होते.

Visit : Policenama.com