home page top 1

कुमार नगर व सप्तश्रृंगी पोलीस कॉलनीत दोन घरे फोडुन चोरट्यांनी लाखो रुपयांवर डल्ला मारला

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात दोन ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारत लाखो रुपये व सोने,चांदीचे दागिने लंपास केले. कुमारनगरात व्यापाऱ्याच्या बंद घराचा फायदा घेत घरात मागील दार तोडून घरात प्रवेश करुन चोरट्यांने घरात ठेवलेले रोख १ लाख ५० हजार रुपये पांढऱ्या पिशवीतून काढुन घेत पोबारा केला. या प्रकरणी शहर पोलीसांत व्यवसायिक मोतीलाल सेवालाल हरिरामानी वय ५४, रा. कुमारनगर यांनी लेखी तक्रार दिल्याने गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

देवपुरातील सप्तश्रृंगी पोलिस कॉलनीत खासगी कंपनीत काम करणारे रोशन रामभाऊ पाटील (वय ३१, रा. भिलाली, ता. पारोळा) हे राहतात. मंगळवारी ते कामानिमित्ताने बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. चोरट्यांनी हिच संधी साधत घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांच्या कपाटाचे लॉकर तोडून चोरट्यांनी २४ हजार रुपये किमतीची एक सोनसाखळी, १८ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि १५ हजार रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी रोशन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

Loading...
You might also like