सांगली : आरगेत चोरट्यांचा धुमाकूळ ; लाखोंचा ऐवज लंपास

मिरज : पोलीसनामा ऑनलाइन – शनिवारी मध्यरात्री आरग (ता. मिरज) येथे ७ ते ८ चोरट्यांनी दुकाने, एक मंदिर व गोडाऊन फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला. यावेळी चोरट्यांकडून एकाला जबर मारहाण देखील करण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

आरग मध्ये झालेल्या या चोऱ्यांमुळे परिसरात मात्र चोरट्यांची दहशत पसरली आहे. ओम ज्वेलर्स, जैन श्वेतांबर मंदिर, दुकाने, धान्य गोडाऊन या सहा ठिकाणी चोऱ्या करून ऐवज लंपास करण्यात आला आहे.
जैन श्वेतांबर मंदिरचे कुलूप उचकटून मास्क घातलेल्या दोन ते तीन चोरट्यांनी चोरी केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मध्यरात्री झालेल्या चोरीची घटना समजताच मिरज ग्रामीण पोलिसांनी संशयित चोरट्यांच्या मागावर पथके देखील रवाना केली आहेत. नेमका किती ऐवज चोरीला गेला ते अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

लहान मुलांना पॅरासिटामॉल देताना घ्या ‘ही’ काळजी

मासिक पाळीदरम्यान या कारणांमुळे स्रियांचा मूड बदलतो

कमी वयात हार्ट अ‍ॅटॅक येण्याचे प्रमाण का वाढतेय ?

डोळ्यांच्या इन्फेक्शनपासून असा करा बचाव