पीएमपीएमएल मध्ये चोऱ्या करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर आणि परिसरात पीएमपीएमएल बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलांचे दागिने आणि पैसे चोरणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट-२ ने अटक केली आहे. या टोळीकडून १०७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ३० हजार रुपये रोख असा एकूण ४ लाख ३६ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे स्टेशन येथील पीएमपीएमएल बस स्टॉपवर करण्यात आली.

कृष्णा उर्फ आण्णा पोपटराव गव्हाणे (वय-२४ रा. वाघोली), आकाश उर्फ आक्या शिवाजी अहिवळे (वय-२० रा. धनकवडी), मंगशे उर्फ मंग्या सुरेश उकरंडे (वय-१८ रा. बाबाजी वस्ती, वाघोली), सुरज किशोर सोनवणे (वय-२१ रा. खराडी), हुकुमसिंग राजसिंग भाटी (वय-४७ रा. खराडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गर्दीच्या ठिकाणी बसमध्ये चढून एखाद्या महिलेला हेरून तिच्याकडील दागिने किंवा पर्समधील पैसे चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस या चोरट्यांच्या मागावर होते. गुन्हे शाखा युनिट २ चे पथक बसमध्ये चोरी करणाऱ्याचा शोध घेत असताना प्रभारी अधिकारी गजानन पवार यांना बसमध्ये चोरी करणारी टोळी पुणे स्टेशन येथे असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुणे स्टेशन येथील बस स्टॉपवर सापळा रचून टोळीला बसमध्ये चढताना ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी लांब पल्ल्याच्या बसमध्ये चढून ज्येष्ठ महिला किंवा एकट्या महिला अथवा इसमाला हेरून ही टोळी त्याला घेराव घालत होती. तसेच गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या किंवा इसमाच्या गळ्यातील दागिने, हातातील पाटल्या आणि पर्समधील पैसे, दागिन्यांची चोरी करत होते. या टोळीने बंडगार्डन, स्वारगेट, शिवाजीनगर, वानवडी या पोलीस ठाण्यच्या हद्दीमध्ये १४ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान, सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी छोट्या उर्फ आकाश अरूण कांबळे (वय-२३ रा. धनकवडी) याला अटक केली. त्याच्याकडून ४ गुन्ह्यातील २४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १ लॅपटॉप, मोबाईल असा एकूण १ लाख ४९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आकाश कांबळे याच्यावर यापूर्वी घरफोडी, दुचाकी चोरी असे एकूण १८ गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे बच्चन सिंग, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक गजानन पवार, सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे, पोलीस कर्मचारी संजय दळवी, यशवंत आंब्रे, अनिल ऊसुलकर, शेखर कोळी, दिनेश गडांकुश, अस्लम पठाण, विनायक जाधव, अतुल गायकवाड, चेतन गोरे, विशाल भिलारे, उत्तम तारु, विवेक जाधव, स्वप्निल कांबळे, कादीर शेख, अजित फरांदे, मितेश चोरमले, गोपाळ मदने यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –