पिंपळे सौदागरमध्ये मोबाईल शोरूम फोडले ; मोबाईल हॅण्डसेट लंपास

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळे सौदागर येथील मोबाईल कंपनीचे शोरूम उचकटून चोरट्यानी शोरूम मधून रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा ऐवज चोरून नेला.

या प्रकरणी प्रदीप जगन्नाथ जाधव (२७, रा चिंचवडे नगर, चिंचवड) याने फिर्याद दिली आहे. तर अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप याचे पिंपळे सौदागरमध्ये गोविंद गार्डन चौक जवळ आयडिया कंपनीचे शोरूम आहे. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास त्या शोरूम कुलूप लावून बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी शोरूमचे शटर उचकटून आत प्रवेश केला. शोरूममधून रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण २२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तपास सांगवी पोलीस करीत आहेत.