मंगलाष्टका सुरू झाल्यानंतर ‘त्यानं’ केलं ‘संधी’चं ‘सोनं’ ; जाणून घ्या नेमकं ‘काय’ झालं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नसमारंभासाठी वरवधूकडील मंडळी घरातील सर्व दागदागिने घेऊन येतात. लग्न सोहळ्यातील मंगलाष्टका हा सर्वात महत्वाचा विधी. त्यासाठी सर्व जण मंचावर जातात. मंगलाष्टका सुरु झाल्यावर सर्वांचे लक्ष वरवधूकडेच असते. हीच संधी साधून एका चोरट्याने वधुचे २ लाख ८६ हजार रुपयांचे हिरे व सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना पुणे-सासवड मार्गावरील स्वराज पॅलेस मंगल कार्यालयात घडली. या प्रकरणी सचिन सुुुभाष पिसाळ (वय ३९, रा. शामाप्रसाद सोसायटी, मोरेबाग, कात्रज, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिसाळ यांच्या मेहुणीचा विवाह ९ मे रोजी उरुळी देवाची येथील स्वराज पॅलेस मंगल कार्यालयात होता. यासाठी ते सकाळी साडेनऊच्या सुमारास आपल्या कुटुंबीयासह वधूचे दागिने घेऊन कार्यालयात पोहचले. सुपारी, साखरपुडा व हळदी समारंभाचे वेळी सचिन यांची पत्नी रोहिणी यांनी सोबत आणलेले दागिने आपली बहिण भाविताला घालावयास दिले होते. कार्यक्रम झाल्यानंतर सर्व दागिने काढून वधूच्या खोलीत एका बॅगेत ठेवून वधूच्या आईकडे देण्यात आले. मंगलाष्टका सुरू झाली, याचवेळी सर्व बाहेर असल्याची संधी साधत चोरट्यांनी खोलीत ठेवलेली बॅग लंपास केली.

विवाह झाल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास सचिन पिसाळ हे वधूला दागिने घालण्यासाठी म्हणून खोलीत आले. त्यावेळी तेथे दागिने ठेवलेली बॅग सापडली नाही. आजूबाजूला त्यांनी शोध घेतला, पण बॅग सापडली नाही. चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी १ लाख रुपये किमतीचे हिऱ्यांचे नेकलेस व कर्णफुले, ३० हजार रुपये किमतीचे हिऱ्यांचे मंगळसूत्र, ६८ हजार रुपये किमतीचे ४ तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, २० हजार रुपये किमतीचे हिऱ्यांचे ब्रेसलेट, २५ हजार ५०० रुपये किमतीचे दीड तोळ्याचे दोन लहान मंगळसूत्र, ८ हजार ५०० रुपये किमतीची अर्ध्या तोळ्याची कर्णफुले, ३४ हजार रुपये किमतीचे २ तोळ्याचा नेकलेस असा एकूण २ लाख ८६ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.

यापूर्वीही लग्नसमारंभातील गडबड, गोंधळ तसेच कोण वधुकडील, कोण वराकडील हे माहिती नसल्याने अनेकदा चोरटे त्याचा फायदा घेऊन मौल्यवान ऐवजावर डल्ला मारल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. तेव्हा मंगलाष्टका सुरु असताना, तसेच इतर कार्यक्रम असताना मौल्यवान वस्तूकडे लक्ष देण्यास विचारु नका, नाही तर नंतर पस्तावण्याची वेळ येऊ शकते.

आरोग्यविषयक वृत्त –

स्वादीष्ट मोमोज आहेत सर्वात निकृष्ट खाद्यपदार्थ

त्याने १२० दिवसात कमी केले तब्बल ३० किलो वजन

कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

फुल फॅटच्या दुधामुळे मधुमेह व हृदयरोगाचा धोका होतो कमी !

Loading...
You might also like