धुळे : शेतकऱ्याचे गोडाऊन फोडून लाख रुपयांच्या ‘पांढऱ्या सोन्या’च्या पोत्यांवर चोरट्यांचा डल्ला

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – ओला दुष्काळाने शेतकरी त्रस्त झाला आहे. अशातच शेतकऱ्याच्या गोडावून मध्ये साठवून ठेवलेले खतांची पोती व कापसाची पोती असा लाख रुपयांचा माल चोरट्यांनी डल्ला मारत लंपास केला.

सविस्तर माहिती की, जिल्ह्यात चोरी सत्रावर नियंत्रण मिळविण्यात पोलीसांना अपयशच येत आहे, अशी चर्चा ग्रामस्थांत रंगली आहे. पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ घोषित करावा अशी मागणी शेतकरी करत आहे.

साक्री येथील शेणपुर गावातील शेतकरी पुंडलिक दगा भामरे यांनी शेतातील गोडावून मध्ये पांढऱ्या रंगाच्या खताच्या गोण्यात भरलेले कपाशीचे 68 पोते प्रत्येक पोत्यात 30 किलो भरलेले असे एक लाख रुपये किंमतीचा माल अज्ञांतानी गोडावूनचे कुलूप तोडुन डल्ला मारत लंपास केले. या प्रकरणी शेतकरी पुंडलीक भामरे यांनी पोलीसांत तक्रार नोंदवली आहे. साक्री पोलीसांनी तक्रारी नुसार गुन्हा नोंद केला आहे.

Visit : policenama.com