सांगलीत बंगला फोडून 5 लाखांचा ऐवज लंपास

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील बायपास रस्त्यावरील व्यंकटेश सृष्टी येथील बंगल्याचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी पाऊणे पाच लाख रुपयांच्या दागिन्यांसह, मनगटी घड्याळ असा ऐवज लंपास केला. ही घटनासोमवारी उघडकीस आली आहे. याबाबत मिलिंद मछिंद्र लभाने यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

मिलिंद लभाने बायपास चौकानजीक असणाऱ्या व्यंकटेश सृष्टीमधील एका बंगल्यामध्ये कुटुंबासमवेत राहतात. ते मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. एका पेट्रोलियम कंपनी मध्ये ते काम करतात. शनिवारी सकाळी आठ वाजता ते घराला कुलूप लावून विजापूर येथे कामानिमित्त गेले होते. रविवारी सकाळी ते परत आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.

चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून बंगल्यात प्रवेश केला. लोखंडी कपाट व लॉकर तोडून कपाटातील पाऊणे पाच लाखांचा ऐवज त्यांनी लंपास केला. यामध्ये हिरे, सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, नेकलेस, कडा, चेन, अंगठी, कानातले जोडे, एक घड्याळ व रोख २५ हजार रुपयांचा समावेश आहे. याबाबत लभाने यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी