भाजप उमेदवार सुभाष भामरेंच्या रॅलीत चोरट्यांचा सुळसुळाट

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीसाठी धुळे मतदार संघातून भाजपचे उमेदवार तसेच पर्यटन मंञी डॉ. सुभाष भामरे यांनी काल अर्ज भरला. अर्ज भरण्यापूर्वी रॅली काढण्यात आली होती. यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी भामरे यांच्या स्विय सहाय्यकासह अनेकांच्या खिशावर डल्ला मारल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीसाठी काल डॉ. सुभाष भामरे यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरला. अर्ज भरण्यापूर्वी रॅली काढण्यात आली होती. यावेळी भामरेंसह अन्य मंत्री उपस्थित होते. पारोळा रोडवर रॅलीला सुरवात होताच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी भामरे यांचे स्विय सहाय्यक यांच्या जवळील २५ हजार रोख तसेच नॅशनल चॅनलचे प्रतिनिधी यांचे महागडे मोबाईल चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत लंपास केले. या घटनेवर पोलीसांनी कारवाई करण्याऐवजी उलट चोरीस गेलेल्या नागरीक व जवाबदार व्यक्तींना प्रश्नावलीची सरबरात केली. याच भिती पोटी कोणीही पोलीसात तक्रार दिली नाही. नको ती पोलीसांची कटकट असे म्हणत हताश होत परतीचा मार्ग निवडला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like